टाटायन
Submitted by माधव on 1 July, 2016 - 02:47
प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. त्यात एक सर्वमान्य असा भाग असतोच पण त्याशिवाय त्या शब्दाच्या अनुशंगाने आलेले आपले वैयक्तीक अनुभव, एखादी विशेष घटना, एखाद्या व्यक्तीने केलेला त्या शब्दाचा खास उच्चार अशा अनेक पातळींवर तो शब्द आपल्या मेंदूत कोरला जातो. 'टाटा' याचा अर्थ एक विशेषनाम असा असला तरी माझ्याकरता त्या शब्दाचा अर्थ 'उद्योग आणि विश्वास' असा कोरला गेला आहे. टाटांचे उत्पादन खरेदी करताना कधीकधी दर्जा थोडा कमी होता असेही झाले आहे पण तरीही आपण लुबाडले गेलोय असे कधीही वाटले नाही. याचे कारण तो दर्जा सुधारत जाणार आहे याची खात्री असते.
विषय:
शब्दखुणा: