ऋतूंना सांग आता राज्य आणा पावसाळ्यावर
Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2016 - 03:01
तुझा मृदगंध रुसलेला पुन्हा येईल ताळ्यावर
ऋतूंना सांग आता ....राज्य आणा पावसाळ्यावर
तिने केसांतुनी बोटे फिरवली की गझल सुचते
कवी निर्माण करते ती खुळ्या शालीन चाळयावर
पसारा खिन्न शेरांचा .... तिच्यावाचून फसलेल्या
तिला सोडून बाकी भाळलेले ह्या गबाळ्यावर
मला माझ्या घरामध्ये नको मानूस आनंदी
व्यथा खच्चून भरलेल्या वह्या आहेत माळ्यावर
तुला माहीत नाही काय जादूगार आहे मी
खरी मैफील गाजवतो तुझ्या खोट्या उमाळ्यावर
दिलासा जाउदे, साधा उसासाही पुरे झाला
अखिल ब्रह्माण्ड हे कुर्बान थोड्याश्या जिव्हाळ्यावर
नव्याने काजळी धरली अश्या त्रासून बघण्याने
विषय:
शब्दखुणा: