त्या सकाळी
Submitted by जोतिराम on 19 March, 2016 - 07:07
केस ओले बांधते ती त्या सकाळी
हासते नि लाजते ती त्या सकाळी
तो हि जागा गोड त्या झोपेत होता
गंध मोहक सांडते त्या सकाळी
थेंब ओल्या रेशमीचे शिंपडे ती
छेडते ती दुर जान्या पाहते ती
थेंब ते गालावरी तो घेत असता
तो पकडतो हात तिचा त्या सकाळी
सोड मजला सोड तू हि छेडखाणी
वेळ आहे हि अशी पाहिल कोणी
बेफिकिरी 'ना' असा तो देत हसता
आई देते हाक तिजला त्या सकाळी
बावरे नि हात झटकत धावते ती
दूर जातानाही मागेच पाहते ती
थांबते दारावरी ती जात असता
जा आता सांगे तिला तो त्या सकाळी
प्रेम म्हणते वेळ ना थांबे कधीही?
वेळ म्हणतो प्रेम का करता कधीही?
ती अनामिक ओढ राही दूर जाता
विषय:
शब्दखुणा: