केंद्रिय अर्थसंकल्प २०१६
Submitted by साती on 1 March, 2016 - 01:52
शेवटी दरवर्षीप्रमाणे सगळे ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते तो केंद्रिय अर्थसंकल्प २०१६ आला.
यातल्या तरतूदी काय आहेत, सामान्यजनांच्या फायद्याचे काय आहे, तोट्याचे काय आहे इ. बाबींवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
मला तरी ग्रामिण भागासाठी विशेष तजवीज, ५० लाखापर्यंत गृहकर्जासाठी विशेष सूट, प्रथम घरखरेदीस विशेष सूट अश्या गोष्टी चांगल्या वाटतायत.
तर टॅक्सेशन स्लॅब न वाढविणे, दोन अतिरीक्त सेस लावणे, कर्मचार्यांच्या पी एफ च्या टॅक्सेशनचा घोळ या वाईट गोष्टी वाटतायत.
नव्या अर्थसंकल्पाचा नव्या आर्थिक वर्षात आपल्यावर आणि देशावर काय परिणाम होणार आहे ही चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
शब्दखुणा: