'स्मरणे गोनीदांची' - 'जाणता कलावंत' - डॉ. श्रीराम लागू
Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 23:24
गोनीदांचं हे जन्मशताब्दी-वर्ष. यंदाचा मायबोलीवर साजरा होणारा मराठी भाषा दिन गोनींदांना समर्पित केला आहे.
गोनींदांनी सर्व साहित्यप्रकारांमध्ये अतिशय सहजतेनं मुशाफिरी केली. 'गाडगेबाबांमुळे मी सहज लिहायला आणि बोलायला शिकलो' असं सांगणार्या गोनीदांच्या कादंबर्या, प्रवासवर्णनात्मक आणि आत्मचरित्रात्मक लेखन जितकं सकस, तितकीच ताकदीची आहेत त्यांनी लिहिलेली नाटकं. 'जगन्नाथाचा रथ', 'काका माणसात येतो', 'वनराज सावध होतात', 'कुऱ्हाडीचा दांडा', 'संगीत राधामाई' ही गोनीदांनी लिहिलेली नाटकं मराठी साहित्याचा अमोल ठेवा आहे.
विषय: