भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी

भोपळ्याची नारळाच्या रसातील मसालेदार भाजी : पुरी थाळीसाठी

Submitted by अमेय२८०८०७ on 14 February, 2016 - 09:29

अलीकडेच मुंबईच्या 'पंचम पुरीवाल्या'विषयीचा व्हिडीओ पाहिला. त्यात दाखवलेली-अनेक रसदार आणि कोरड्या चटपटीत भाज्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या असलेली थाळी - वेड लावून गेली. मग डोसक्यात तीच थाळी, आज सकाळी मोकळा वेळ मिळाल्यावर त्या थाळीची घरगुती नक्कल करून पाहिली. अर्थात चार पाच भाज्या करणे शक्य नव्हते पण साध्या आणि पालक पुऱ्यांसोबत मटार-बटाटा गरम मसाला रस्सा, भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी, गुजराती कढी आणि गाजर-टोमॅटो कोशिंबीर असा मेन्यू ठरवला.
यातली भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी खास आवडून गेली. एका मित्राकडून ही रेसिपी नुकतीच कळली होती.

विषय: 
Subscribe to RSS - भोपळ्याची नारळाच्या रसातील भाजी