तुम्हा सर्वांना माझ्या लग्नाला बोलवायची फार इच्छा होती परंतू ..
पण काय करणार, नाईलाज आहे. मला माझ्या लग्नाला पोलिसांची भानगड नकोय.
हो, जर मजाक मजाक मध्ये ९८ जण जमलात, तर उगाच पोलिसांची परवानगी घ्यायला लागेल.
अर्थात, साखरपुड्यालाही नाही बोलवता येणार. अगदी हळदीलाही नाही बोलवता येणार.
कारण आपले फडणवीस सरकार आणखी एक नवा कायदा करू बघतेय.
तो असा, की आता तुमच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला १०० पेक्षा जास्त माणसे जमा झाली तर पोलिसांची परवानगी आवश्यक.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/wedding-c...
लोकशाहीतून हळूहळू आपण सेमीहुकुमशाहीकडे जात आहोत.