अमेरीकन

जंबलाया

Submitted by स्वाती२ on 15 July, 2015 - 09:54

सध्या लेक घरी रहायला आलाय त्यामुळे बरेचदा शुक्रवारी संध्याकाळी माय-लेक मिळून स्वयंपाक करतो. काही वेळा पारंपारीक मराठी तर काही वेळा इतर प्रांतातले/देशातले त्याच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या वेळी मूड क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता. या विषयी थोडेसे. लुझियानाच्या न्यु ओरलिन्स भागात फ्रेंच लोकांनी वसाहती केल्या आणि काही काळ स्पॅनिश वसाहती देखील होत्या. त्याशिवाय वेस्ट आफ्रीकेतून १८ व्या शतकात गुलाम आणले गेले. तसेच 'फ्री कलर पिपल' या प्रकारात मोडणारे इतरही लोकं आले. वसाहतीत जन्मणारे युरोपिअन वंशाशी नाते सांगणारे ते फ्रेंच क्रिओल आणि इतर वंशाचे ते लुझिआना क्रिओल असे ओळखले जात असत.

विषय: 
Subscribe to RSS - अमेरीकन