आणि ............... श्री रुपनारायण !
Submitted by विशाल कुलकर्णी on 13 June, 2015 - 02:54
मागच्या रवीवारी पुन्हा एकदा कोकणवारीचा योग घडून आला. विशेष म्हणजे हा दौरा दोस्तांबरोबर होता, त्यामुळे रंगत अजुनच वाढली होती. निमित्त होते एका मित्राच्या आमंत्रणाचे. त्याच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस त्यामुळे तिच्या लाडक्या काका लोकांस आमंत्रण होते. नाहीतरी कोकणात जायला आम्ही निमीत्तच शोधत असतो. आताही पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. श्रीवर्धनला त्याच्या घरी एक दिवस मुक्काम केला आणि दुसर्या दिवशी परत येताना पुन्हा एकदा दिवे आगारला भेट दिली. माझ्या मागील लेखावर काही आंतरजालीय मित्रांनी आवर्जून दिवेआगारच्या रुपनारायणाचे दर्शन घेतलेस का अशी विचारणा केली होती.
विषय:
शब्दखुणा: