जीवन किती घनदाट वन
Submitted by बेफ़िकीर on 10 June, 2015 - 06:06
गझल - जीवन किती घनदाट वन
जीवन किती घनदाट वन
विकलांग तन, विचलीत मन
येते, जिथे होते सुरू
ही वाटही आहे गहन
मरणासही तल्लफ सदा
जन्मासही माझे व्यसन
मेले तरी मतभिन्नता
काही दफन, काही दहन
नाही पुन्हा स्मरलो तुला
मी पाळले माझे वचन
तू साठवत आहेस धन
मी माणसे करतो जतन
नुसती पहा माझ्याकडे
बघ सावळे झाले गगन
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: