प्रभात पुरस्कार - २०१५
Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 June, 2015 - 13:23
१ जून, १९२९ रोजी विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी यांनी कोल्हापुरात ’प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. कंपनीचं बोधचिन्ह होतं उगवत्या सूर्याकडे बघत तुतारी फुंकणारी स्त्री. बुद्धिमत्ता, पावित्र्य, धैर्य, सौंदर्य, कलात्मकता असे गुण या बोधचिन्हात एकवटले होते. ’प्रभात’नं निर्माण केलेल्या सर्व चित्रपटांनी आपल्या बोधचिन्हाचा मान राखत विलक्षण सातत्यानं दर्जेदार निर्मिती केली. ’प्रभात’नं चित्रपटाला बोलतं केलं. ’अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट ’प्रभात’चा.
शब्दखुणा: