निरोपाची आठवण ..
Submitted by प्रकु on 21 May, 2015 - 16:58
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.
विषय:
शब्दखुणा: