तहान
Submitted by vasant_20 on 19 May, 2015 - 10:42
आजुबाजुला कुणीच दिसत नव्हतं. अगदी सावली सुद्धा..! ती सुद्धा पायाखाली घुटमळत होती. वर आभाळाकड पाहील की आपोआप डोळे छोटे व्हायचे मध्येच वाऱ्याचा एखादा गरम झोत यायचा त्याने जीवाची अजुनच लाही लाही व्हायची. एखादी वावटळ स्वतःच भोवती गिरक्या मारताना दिसायची पार खालून वर अभाळा पर्यन्त जायची. त्याचा सूसू आवाज अजुनच मनाला कावर बावर करायचा. पण बुडख्या डोंगर तसाच शांत उभा दिसायचा एखाद दुसर झाड़ त्याच्या अंगा खांद्यावर खेळायच पण वैशाख सुरु झाला की त्याची पण हाडच राहायची, मग कुणीतरी वाडीतल त्याची एखाद फांदी तोडून न्यायच सरपणाला.
विषय: