सोहं

माझे स्वामी (स्वरूपानंद)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 May, 2015 - 13:15

माझे स्वामी
माझे मनी
नित्य वसो
सोहं ध्वनी ||
श्वासातल्या
लयीमधला
स्वर गुंजो
कणोकणी ||
सारे पडावे
उभे राहिले
खोटेनाटे
भाव गळुनी ||
सर्व व्यापी
सर्वातीत
सोहं भाव
यावा दाटुनी ||
हृद्याकाशी
तच उरावा
जिवलग रे
सारे सुटुनी ||
पंचकोट हा
पंचभूतांचा
आणि जावा
मी हरवूनी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Subscribe to RSS - सोहं