आठवनिंच्या गर्दित
Submitted by मिलिंद खर्चे on 27 April, 2015 - 09:34
तिला प्राजक्त खुप आवडतो. अजुन रात्र रात्र जागुन तो ही प्राजक्त उमलन्याची वाट बघतो. प्राजक्ताच्या उमलनारया मुक्या कळ्याना आपल्या मुक्या भावनांशी जोळु लागतो. हळु-हळु मंद गतीने वाढणारा गारवा, त्यात अलगद उमलनारी प्राजक्त कळी त्याला वेळावुन सोडते. ती उमलन्याच्या उंबरठ्यावर असणारी प्राजक्त कळी आणि सौम्यतेने बहरलेली त्याची प्रीती यात त्याला साम्यता जाणवते. आठवनिंच्या गर्दित हरवून पुन्हा तो ते क्षण जगु लागतो.
विषय:
शब्दखुणा: