विधीनिषेध

विधीनिषेध

Submitted by Charudutt Ramti... on 10 April, 2015 - 05:06

“विधीनिषेध”

गृहीतकांचे पाडून वाडे,
मी बैसलो संध्येस होतो…
आचमनास पापणी मधला
अश्रुही उरला नाही…

श्राद्धास आणिले दर्भ
त्यांचे संदर्भच विसरून गेलो
कावळ्यान्नाही आता लोभ
पिंडाचा उरला नाही…

वपनाने स्वाभिमान शिल्लक
औषधासही ठेवला नाही
गणगोतान्च्या आठवणींचा पौषही
लवकर सरला नाही…

मनामनातल्या विषयांचा मी
द्रोण फाडून टाकला
तरीही अळू वासनेचा
पांढ-या भातात पसरला नाही…

वस्तुस्थितीचा बळी मी एकलकोंडा
जगतो अलगद केन्व्हाचा
मरावयापुरताही आता,
विधीनिषेध उरला नाही…

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विधीनिषेध