नागझिरा - व्यंकटेश माडगुळकर
Submitted by अनंत बेडेकर on 30 March, 2015 - 13:48
‘नागझिरा जंगलातील दिवस’ हे अगदी छोटेखानी पुस्तक. विविध वाङ्मयप्रकार सहजतेने हाताळणारे सिद्धहस्त लेखक व्यंकटेश माडगुळकर हे 'बंदुक टाकून हातात दुर्बिण घेतलेले जंगल-जीवन रेखाटनकार आणि शब्दचित्रकार' म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. पुस्तकाच्या सुरूवातीला आभारादाखल केलेले छोटेसे निवेदन हे खरंतर छोटिशी प्रस्तावनाच आहे. १९७८ च्या मे महिन्यात लेखकाने नागझिरा जंगलात एकट्यानेच मुक्काम करून जे पाहिले, जे रेखाटले त्याचे हे पुस्तक. माडगुळकर मुळचे शिकारी. शिकारी-लेखक आणि वन्यजीवन संशोधक अशा दोन्ही प्रकारच्या पाश्चात्य लेखकांचे या विषयावर संशोधनात्मक विपुल लेखन माडगुळकरांनी वाचलेले, अभ्यासलेले आहे.
विषय: