तुझ्या येऊन जाण्याचे पुरावे राहिलेले
Submitted by बेफ़िकीर on 1 January, 2015 - 14:35
तुझ्या येऊन जाण्याचे पुरावे राहिलेले
जणू जाऊन येण्याचे दिखावे राहिलेले
तुझ्यामाझ्यात काही राहिले नाहीच आहे
न काही राहणे मग का असावे राहिलेले
मिठ्या मारून खोट्या खूपसे मी नष्ट केले
हवे होते मला बाकी दुरावे राहिलेले
मनाची भिंत ढासळली व्यथांच्या वास्तवाने
तरी देतात ही स्वप्ने......गिलावे राहिलेले
तुझी ती योग्यता झाल्यावरी......ढोबळपणाने
तुला सांगेन काही बारकावे राहिलेले
प्रवाहालाच आता व्हायचे आहे किनारा
कशी घेईल होडी हेलकावे राहिलेले
असा मी राहिलो शोधत तुझ्यामध्ये स्वतःला
जणू होते तिथे माझे सुगावे राहिलेले
तुझ्यापर्यंत येण्याएवढे श्रीमंत नव्हते
विषय:
शब्दखुणा: