साय फाय

वर्तुळ, चक्राकार, आवर्त

Submitted by पायस on 29 December, 2014 - 19:22

रयुजी(इंग्रजी आवृत्तीत नोहा) आपले काम करतोय आणि अचानक टीवी ऑन होतो. एका आठवड्यापूर्वी पाहिलेली व्हीडीओ टेप लागलेली असते. एक विहीर दिसतेय. सादाको(समारा) विहिरीतून सरपटत बाहेर येते. रयुजी गोंधळतो, टीव्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो पण टेप चालूच राहते. ती तसेच पुढे येत येत टीव्हीतून बाहेर पडते. ऑलरेडी टरकलेला रयुजी(नोहा) तिच्याकडे आ वासून बघत राहतो, पळण्याचा एक असफल यत्नही करतो. मग स्क्रीनवर दिसतो तिचा फेमस मृत्युकटाक्ष. त्याचे अंग विचित्र तर्‍हेने आखडायला लागते. चेहरा वेडावाकडा होतो व असह्य वेदनांनी तो जमिनीवर कोसळतो.

विषय: 
Subscribe to RSS - साय फाय