मी जहालही नाही...मी मवाळही नाही

मी जहालही नाही...मी मवाळही नाही

Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2014 - 10:38

गझल - मी जहालही नाही...मी मवाळही नाही

मी जहालही नाही...मी मवाळही नाही
मी कुणीच नाही हा...ठोस आळही नाही

तू नटायच्या आधी...बोललीस का काही?
आज वेळही नाही...आणि काळही नाही

धर्म कोणता माझा...हे कळायचे केव्हा
ना पुरायला खड्डा...आणि जाळही नाही

क्लिष्ट ह्या प्रवाहाचा...एक थेंब मी साधा
धड मला न सापडतो...धड गहाळही नाही

रंग पाहिजे तेव्हा...पाहिजे तसा होतो
दैव सावळे, गोरे...वा गव्हाळही नाही

एक मागणी साधी...हे नशीब फेटाळे
कापडी खिश्याजागी...टांकसाळही नाही

शोधता न येतो जो...तो नगण्य बिंदू मन
ज्यास व्यापण्या धजते...अंतराळही नाही

का भरून यावी ही...ओढणी तुझी आत्ता

मी जहालही नाही...मी मवाळही नाही

Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2014 - 10:35

गझल - मी जहालही नाही...मी मवाळही नाही

मी जहालही नाही...मी मवाळही नाही
मी कुणीच नाही हा...ठोस आळही नाही

तू नटायच्या आधी...बोललीस का काही?
आज वेळही नाही...आणि काळही नाही

धर्म कोणता माझा...हे कळायचे केव्हा
ना पुरायला खड्डा...आणि जाळही नाही

क्लिष्ट ह्या प्रवाहाचा...एक थेंब मी साधा
धड मला न सापडतो...धड गहाळही नाही

रंग पाहिजे तेव्हा...पाहिजे तसा होतो
दैव सावळे, गोरे...वा गव्हाळही नाही

एक मागणी साधी...हे नशीब फेटाळे
कापडी खिश्याजागी...टांकसाळही नाही

शोधता न येतो जो...तो नगण्य बिंदू मन
ज्यास व्यापण्या धजते...अंतराळही नाही

का भरून यावी ही...ओढणी तुझी आत्ता

Subscribe to RSS - मी जहालही नाही...मी मवाळही नाही