केंव्हा तरी.......
Submitted by डॉ अशोक on 9 December, 2014 - 01:59
केंव्हा तरी.......
*
आता नको बोलेन मी केंव्हा तरी
सारे खरे सांगेन मी केंव्हा तरी !
*
माझे असे हे जाहले सांगावया
दैवासही गाठेन मी केंव्हा तरी !
*
जिंकूनही ते पैतरे सांगावया
शत्रूसही भेटेन मी केंव्हा तरी
*
लाटून गेले फायदे, कोठे जरी
खेचून त्या आणेन मी केंव्हा तरी
*
पाहून ना गेलो कधी, बाकी किती?
शून्यासही भागेन मी केंव्हा तरी
*
-अशोक
विषय:
शब्दखुणा: