असं घडू शकतं?
Submitted by आशिका on 20 November, 2014 - 06:00
माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे लावी सुगंधाचे लेणे
आपल्या सहावीत शिकणार्या नातवाला पाठ्यपुस्तकातील ही कविता जाधव बाई अगदी तन्मयतेने शिकवत होत्या. कवितेचा भावार्थ सांगताना मध्येच त्यांचे डोळे पाणावत होते. नातवाने विचारले देखील की "आजी, तुला तुझ्या आईची आठवण येतेय का गं?" त्या निरागस जीवाच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत बाईंनी कविता पूर्ण शिकवली.
विषय:
शब्दखुणा: