कुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न
Submitted by नितीनचंद्र on 30 August, 2014 - 04:49
राजकारणात प्रसिध्दीच्या झोतात कसे रहावे याचा वस्तुपाठ अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केला. त्याचेच अनुकरण करत कुमार विश्वास यांनी भाजपचा एक नेता मला येऊन भेटला आणि भाजपने मला दिल्लीत मुख्यमंत्री होण्याचे आश्वासन देत भाजप मध्ये सामिल होण्याचे सांगीतले असे विधान केले.
हा भाजपचा नेता कोण हे त्यांना आठवत नसावे कारण हा प्रसंग घडलेला नसुन हे बहुदा दिवास्वप्न आहे. दिल्लीचे ना. राज्यपाल यांनी गुप्त मतदानाचा उपयोग करुन सरकार बनविण्याची कवायत सुरु करताच कुमार विश्वास यांना स्वप्न पडले हे खासच.
भाजप मध्ये काय दिल्लीत नेत्यांची वानवा आहे म्हणुन हा वाचाळ आआप नेता भाजप आयात करेल ?
विषय: