'तुम्ही फक्त लढ म्हणा!' - श्रीमती स्मिता तळवलकर
Submitted by चिनूक्स on 6 August, 2014 - 14:44
त्या दिवशी स्मिताताईंच्या घरी पोहोचायला मला चांगलाच उशीर झाला होता. 'चार वाजता येऊ दे त्याला, मग तासाभरात मुंबईला जायला निघेन', असं त्यांनी मोडककाकांना फोनवर सांगितलं होतं. तोपर्यंत मोडककाकांनी संगीत दिलेली गाणी वापरण्यासाठी मोडककाकांच्या मध्यस्थीनंच पाचसहा वेळा फोनवर त्यांच्याशी बोललो होतो. यावेळीही त्यांनीच माझ्यासाठी वेळ मागून घेतली होती, आणि लॉ कॉलेज रस्त्यावरची त्यांच्या घराची गल्ली काही केल्या मला सापडत नव्हती. मग शेवटी मला फोनवर पत्ता सांगून त्या कंटाळल्या आणि पन्नास फुटांवर असूनही सापडत नसलेल्या घरी मला नेण्यासाठी त्या खाली आल्या.
विषय:
शब्दखुणा: