महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४

महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा

Submitted by कविन on 22 July, 2014 - 07:21

महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा

नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्‍या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे सात सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.

Subscribe to RSS - महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४