शब्द नव्हे हा मायाबाजार
Submitted by नितीनचंद्र on 9 July, 2014 - 09:45
कधी तलवार तर कधी कट्यार
कधी मार्मीक तर कधी "ड्यू" वार
शस्त्राहुन भेदक हत्यार
नसता समोर तरी बेजार
शालजोडीतला पैजार
डंखाहुनी अती विखार
नवोदितांची आवक फार
जख्मी होता होती पसार
तरी दिसती किती लाचार
दिवसागणी कविता सुमार
विद्वानांचा तोरा अपार
अड्ड पालखीचा जरतार
यमक जुळवता शिणलो यार
शब्द नव्हे हा मायाबाजार
विषय:
शब्दखुणा: