राहु राशी बदल
Submitted by नितीनचंद्र on 6 July, 2014 - 19:29
वर्षभरात जे ग्रहांचे राशीबदल होतात त्यांची गोचर फळे अनुभवण्यासरखी असतात. आपल्या जन्मकुंडली प्रमाणे ही फळे वेगवेगळी असतात. यातुनही जे ग्रह वर्षभर एका राशीत असतात त्यांची गोचर फळे जरुर अनुभवावी.
राहु राशी बदल हा १३ जुलै ला रात्री ७ वाजुन २३ मिनीटांनी होत आहे. तुळ राशीत असलेला राहु या तारखेला आता कन्या राशीत येत आहे.
राहु हा ग्रह काहींच्या मते शनी सारखी फळे देतो. काहींच्या मते तो ज्या ग्रहासोबत असतो त्यांची शुभफळे नीट अनभवु देत नाही. काहींच्या मते एकटा राहु राजयोगकारक आहे.
कन्या राशीत येणारा राहु हा १८ वर्षांनी येत आहे. तो कुणाला पहिला येईल किंवा बारावा.
विषय:
शब्दखुणा: