वाद,...
जुन्यासह नवे माणसंही
जोशामध्ये भिडले जातात
जुन्यासह नवे वादही
नव्या-नव्यानं लढले जातात
कुणी नैतिकतेनं लढतात तर
कुणाचे विचार हिनले जातात
मात्र वादांची इथे कमी नाही
ते घडवुन सुध्दा आणले जातात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
उशीराचे शहाणपण
जिथे-जिथे नको आहे तिथे
नको तितके बहाणे असतात
गरज नसलेल्या ठिकाणी मात्र
सगळेचजण शहाणे असतात
आपल्या मनाचे शहाणपण तर
आपल्या मनाचाच तुरा असते
गरज असलेले शहाणपण मात्र
नेहमीचेच इथे उशीरा असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक विध्वंस
नैसर्गिक आपत्तींची
नैसर्गीक पीडा आहे
नैसर्गिक नियमांना
नैसर्गिक तडा आहे
नैसर्गिक डाव-पेचांचा
नैसर्गिक कावा आहे
नैसर्गिक विध्वंसाचा
हा जाहिर पुरावा आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हसण्याचे सत्य
प्रत्येकाच्याच जीवनामध्ये
अटळ स्थानावर हशा असतो
कुणी खद-खदा हसतो तर
कुणी-कुणी मुरमुशा हसतो
कित्तेकांनी हे मान्य केलं की
हसतील त्यांचे दात दिसतील
पण ज्यांना दातच नसतील
त्यांचे दात कसे दिसतील,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
टोमण्यांचा साक्षीदार
बाहेरच्यांसह आतले सुध्दा
आता धारेवर धरू लागले
सरकारच्या विरोधात असे
उलट वारे फिरू लागले
सरकारवर निशाणा साधत
आता वारंवार टोमणा आहे
मारलेल्या कित्तेक टोमण्यांचा
साक्षीदार "सामना" आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शाब्दिक आक्रमण
सरळ बोलता येईल तिथे
सरळ-सरळ वार आहेत
कुणावरती ना कुणावरती
रोज शाब्दिक प्रहार आहेत
सरळ बोलता नाही आल्यास
शालीतील जोड्यांचे वापर आहेत
शाब्दीक आक्रमण करण्यासाठी
इथे एकापेक्षा एक सुपर आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नातं जबाबदारीचं
वाटलं नसेल त्यांनाही
कि बार चा असा बार होईल
आपण केल्या कर्मावरती
अशाप्रकारे प्रहार होईल
मात्र आपण काय करावं हे
प्रत्येकाला कळायला हवं
आपल्या जबाबदारीशी नातं
जबादारीनं पाळायला हवं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
जनतेच्या भावना,...
विकासाची तळमळ सदा
जनतेच्या मनी घूटमळते
मात्र विकासाची दशा इथे
जणू सदैव खळखळते
जनतेच्या आशा-अपेक्षांना
जणू झोलाच दिला जातो
जनतेच्या भावनेचा सांगा
विचारच कुठे केला जातो,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शेतकरी,...
शेतकर्यांना इजा होणारी
कुणी भाषा करू लागलेत
ज्यांच्या आशा धरायच्या
तेच ठोशा मारू लागलेत
'शेतकरी जगाचा पोशिंदा' या
निष्ठेचा आशय गेला आहे
अन् शेतकरी जणू त्यांच्या
चेष्ठेचा विषय झाला आहे,..?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आठवणी,...
जीवनामध्ये खुप काही
प्रत्येकाला कमवावं वाटतं
मात्र जे आयुष्यभर कमावलं
तेही क्षणात गमवावं लागतं
कुणी अनुभव घेऊन पाहतात
कुणी अनुभव दूरून पाहतात
कमावलेल्या अन गमावलेल्या
आठवणी मात्र उरून राहतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३