निष्कर्ष पहिल्या पावसाचा
प्रतिक्षेतला पहिला पाऊस
अगदीच वेळेवरती आला
कुणाचा आनंद हिरावणारा
तर कुणासाठी स्फुर्ती झाला
कुठे आनंद दिला आहे तर
कुठे नुकसानही केलं आहे
पहिल्या पावसाच्या निष्कर्षाला
आनंदासह दु:खही ओलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आनंदाचा पाऊस
तापलेल्या धरणी वरती
थेंबांची बरसात असते
अन् वाढत्या उष्माघाताची
पावसाळ्यापर्यंतच औकात असते
सुगंध उधळत मातीचा
कण-कणही स्फुरला जातो
अन् पहिला पाऊस नेहमीच
इथे आनंदाचा ठरला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सवय दोन मिनिटांची
नवरा म्हणाला बायकोला
तु अशी का फुगली आहे
दोन मिनिटात खायला कर
जाम भुक लागली आहे
मग बायको म्हणाली नवर्याला
म्यागीची हौस अजुन का भरली नाही,.?
दोन मिनिटाच्या नाष्ट्याची
माझ्यात हिंमत उरली नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
महापुरूषांचे स्मारक
महापुरूषांच्या स्मारकाचे वाद
हि गोष्ट नविन राहिलेली नाही
असे क्वचितच सापडतील की
ज्यांनी हि गोष्ट पाहिलेली नाही
कित्येक महापुरूषांचं स्मारक
जरीही वादात घेरलेलं असतं
पण महापुरूषांचं स्मारक मात्र
जनतेच्या ह्रदयात कोरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पावसा पावसा ( बालवात्रटिका )
सांग पावसा तु येशील का
धरणीला पाणी देशील का
धरणी भिजुन जाईल रे
हिरवी-हिरवी होईल रे
ये पावसा तु धरणीवर
वर-वरतुन तु बघू नको
तहानली रे धरती ही
वारंवार तु फसवु नको
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पावसा पावसा ( बालवात्रटिका )
सांग पावसा तु येशील का
धरणीला पाणी देशील का
धरणी भिजुन जाईल रे
हिरवी-हिरवी होईल रे
ये पावसा तु धरणीवर
वर-वरतुन तु बघू नको
तहानली रे धरती ही
वारंवार तु फसवु नको
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पर्यावरण दिन,...
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छांचा
सोशियल मिडीयातुन पुर आहे
मात्र शुभेच्छा देता-घेतानाही
जबाबदार्यांचा जणू धुर आहे
वाढत्या पर्यावरणीय विध्वंसाची
माणसांनी जाण ठेवायला पाहिजे
अन् पर्यावरण दिनाच्या औचित्याने
एक तरी झाड लावायला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पहिला पाऊस,...
पहिल्या पावसाच्या पडण्याने
मना-मनाचा आनंद उदंड होतो
पहिल्या पावसाच्या भिजण्याने
इथे मातीचा सुध्दा सुगंध येतो
मात्र या नैसर्गिक रीतीवरतीही
प्रदुषणीय प्रताप होऊ शकतो
अन् पहिल्या पावसाचा कुठे
दुर्गंध सुध्दा येऊ शकतो,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
अंधश्रध्दा
जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते
कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मँगी प्रकरण
कुणी अटकतो आहे तर
कुणी मात्र झटकतो आहे
अन् मँगीचा विषय आता
कुणा-कुणाला खटकतो आहे
मँगीवरचे विश्वासही आता
जनतेमधून तडकले आहेत
अन् जाहिरात करणारे चेहरेही
मँगी प्रकरणात अडकले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३