पॉप अप येण कस थांबवाव ?
Submitted by नितीनचंद्र on 25 April, 2014 - 10:13
सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे. मी रोजच किमान ५-६ तास लॅपटॉप वर कामाच्या मेल्स असुदे, फेस बुक असुदे किंवा आपली मायबोली असुदे यावर रममाण होतो.
क्लिक कुठेही करुदे. एक वेब साईट प्रकट होते. एक तर ती वेब साईट पुन्हा पुन्हा पहावी अशी त्या नियंत्याची इच्छा आणि किमान ती विन्डो मिनिमाइझ करावी लागते आणि पुढे काम सुरु होते.
याला बहुदा पॉप अप असे म्हणातात. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )
यावर काय उपाय आहे ? मायबोलीवर सुध्दा या नको असलेल्या जाहीरातींची ची भरामर आहे. याने संपुर्ण स्क्रीन व्यापला जात नाही. पण स्क्रीनचा काही भाग मात्र नक्की व्यापतो.
विषय:
शब्दखुणा: