सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे. मी रोजच किमान ५-६ तास लॅपटॉप वर कामाच्या मेल्स असुदे, फेस बुक असुदे किंवा आपली मायबोली असुदे यावर रममाण होतो.
क्लिक कुठेही करुदे. एक वेब साईट प्रकट होते. एक तर ती वेब साईट पुन्हा पुन्हा पहावी अशी त्या नियंत्याची इच्छा आणि किमान ती विन्डो मिनिमाइझ करावी लागते आणि पुढे काम सुरु होते.
याला बहुदा पॉप अप असे म्हणातात. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )
यावर काय उपाय आहे ? मायबोलीवर सुध्दा या नको असलेल्या जाहीरातींची ची भरामर आहे. याने संपुर्ण स्क्रीन व्यापला जात नाही. पण स्क्रीनचा काही भाग मात्र नक्की व्यापतो.
मायबोलीकर अॅडमीन आपल्याला याचे पैसे मिळत असतील कारण मायबोली काही फुकट चालवली जात नाही याची जाणिव आहे.
गुगल क्रोम वरुन येणार्या डेटींग च्या पॉप असो की जबंगच्या विक्रीच्या पॉप अप. सुखाने काम करु देत नाहीत. बर डेटींगचा एकदा पॉप अप आला. कामात गडबड नको म्हणुन मिनीमाईझ केला की लगेच दुसरा येतो.
टार्गेटेड कस्टमर असल्याशिवाय असल्या मार्केटींगचा फायदा नाही इतका साधा सुधा नियम या इलेट्रीनीक मार्केटींग वाल्यांना कसा कळत नाही ? ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )
व्हीयुबी सपोर्ट नावाचा आणखी एक पॉप अप यात हा पॉप अप नुसत्या तुमच्या स्क्रीनचा ताबा घेऊन थांबत नाही तर तुमच्या स्पॉकर्स चा ताबा घेऊन एक रटाळ संगीत सुरु करतो. यात कुणीतरी नवोदीत गायक गात असतो आणि त्याला लाईक करायच असत म्हणे. ज्या पॉप संगीतात आपल्याला रुची नाही, आवड नाही ते संगीत मायबोलीसाठी वेळ काढला असता का ऐकायच ? म्हणुन त्यांना एक मेल केली की मी तुम्हाला मेल पाठवुन ह्या पॉप अप साठी निमंत्रीत केलेले नाही सबब या त्रासातुन माझी सुटका करा.
यावर त्यांचे उत्तर आले ते मोठे मजेशीर आहे.
Thank you for emailing Vube Support.
Your email address is not registered on Vube.com. I understand that you are not interested in Vube advertising. Unfortunately, we don't have very much control over where our ads are shown and we don't have any sort of "list" we can unsubscribe you from. The website you were visiting when you saw the ad controls when and how often you see the ad. These ads are not sent to your email address - they are simply built in to the website you are visiting when you see them. Websites usually sell pop-ups and other types of advertising to pay for free services they offer. By browsing these websites, you agree to their Terms & Conditions, and it is most likely that they allow for video pop-ups.
We don't allow websites that use our ads to show more than one ad per 24 hours. If you are seeing our ads more often than that, then please let us know because we'd like to help change that. Please note that other websites also advertise through pop-ups, so while you should only see our pop-ups once per day, you may see other pop-ups from other websites.
When you see one of our ads, the website that serves the ad places a cookie on your computer, which prevents that site from showing another of our ads for 24 hours. Because our ads appear on multiple sites, it is possible that you may encounter our ads more than once a day if they come from different websites - each site will have its own cookie.
Please let us know if you have any questions.
Thanks,
David
Vube Team
मी फक्त तीनच वेबसाईट्स पहातो. फेस बुक, जीमेल आणि मायबोली. त्या एक तासात किमान ५ पॉप अप्स ताबा घेतात. यात कोणती वेब साईट उघडली म्हणजे कोण ताबा घेतो याच लॉजीक तयार व्हायचय.
समस्त मायबोलीकरांचा काय अनुभव आहे ? ह्या पॉप अप्स गुगल क्रोम शी संबंधीत आहेत का आणि गुगल क्रोम ऐवजी जर मोझीला उघडले तर हा त्रास कमी होईल काय ?
फायरफॉक्स घ्या, गूगल पुरस्कृत
फायरफॉक्स घ्या, गूगल पुरस्कृत अॅड्स तरी ताबडतोब थांबतील.
मला आजपर्यंत कधीही मायबोलीवर पॉपप आलेले नाहीत.
दुसरी गोष्ट चांगला अँटीव्हायरस वापरून, एकदा काँप्युटरला काही किडे आहेत का ते पहा, असलेत तर मारा.
गुडलक.
अॅडब्लॉकप्लस वापरा.
अॅडब्लॉकप्लस वापरा.
नितीनचंद्र, मायबोलीवर पॉपप्स
नितीनचंद्र,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवर पॉपप्स येणे अपेक्षित नाही. तसे येत असतील, तर कृपया स्क्रीनशॉट प्रशासकांना पाठवा. आणि चांगला अॅण्टीमालवेअर इन्स्टॉल करून एकदा स्कॅन करून घ्या.
माझ्याकडे क्वीक हील आहे.
माझ्याकडे क्वीक हील आहे. ह्यात अॅण्टीमालवेअर आहे. त्याचे स्कॅनिंग पुन्हा करुन पहातो.
क्वीक हील मॉलवेअर स्कॅन
क्वीक हील मॉलवेअर स्कॅन करुनही गुगलक्रोमवर काहिही फरक पडला नाही.
अॅडब्लॉक प्लस इन्स्टॉल केलं
अॅडब्लॉक प्लस इन्स्टॉल केलं नाही तर माझ्याही पीसीवर मायबोलीवरुन पॉप अप्स येतात. माझ्याकडे उत्तम अॅन्टी व्हायरस आहे तरीही.
माझ्या डेस्कटॉप किंवा
माझ्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर अॅडब्लॉक नव्हतं तेव्हापण कधी पॉपअप्स आले नाहीत. मी क्रोम वापरते.
क्रोमच्या अॅडव्हान्स सेटिंग्जमधे मी 'एनेबल मालवेअर प्रोटेक्शन' आणि 'सेन्ड अ डू नॉट ट्रॅक रिक्वेस्ट विथ युअर ब्राउजिंग' असे दोन पर्याय एनेबल केलेत. आणि 'ऑटोमॅटिकली सेन्ड यूसेज स्टॅटिस्टीक्स' हा पर्याय डिसेबल केला आहे.
माझंही हेच सेटींग आहे.
माझंही हेच सेटींग आहे. अॅडब्लॉक इन्स्टॉल करणं भाग पडलं तरीही.
(No subject)
वरदाजी, खालील सेटींग बरोबर
वरदाजी,
खालील सेटींग बरोबर आहे का?
Use a web service to help resolve navigation errors ( इनेबल )
Use a prediction service to help complete searches and URLs typed in the address bar( इनेबल )
Predict network actions to improve page load performance( इनेबल )
Send suspicious downloaded files to Google
Enable phishing and malware protection( इनेबल )
Use a web service to help resolve spelling errors
Automatically send usage statistics and crash reports to Google
Send a "Do Not Track" request with your browsing traffic ( इनेबल )
जिथे ( इनेबल ) लिहलेले नाही ते डिसेबल
Download adwcleaner and run.
Download adwcleaner and run. It will show if your browsers are infected with adwares. If so , it will clean it.
मेबी दुसरा प्रोब्लेम असु
मेबी दुसरा प्रोब्लेम असु शकतो.
कदाचित होमपेज ब्लँक ठेवा. जास्तीचे टुल बाद अनइन्सटॉल करा.
क्रोम साठी तुम्ही हि सर्विस
क्रोम साठी तुम्ही हि सर्विस वापरून पाहू शकता .
https://chrome.google.com/webstore/detail/poper-blocker/bkkbcggnhapdmkel...
या मध्ये कोणत्या वेबसाईट्स वरून पॉप अप यायला हवे आणि कोणत्या नकोत ते सेट करता येते. एक छोटे नोटिफ़िकेशन येते, वेब लिंक सोबत. मी वर्षभर वापरतेय. चांगले आहे. adblock plus च्या मानाने हे जास्त चांगले वाटले मला.
काही काही adblock apps पॉप अप्स block नाही करत, अश्यावेळी हे उपयोगी पडते. मी हे
https://chrome.google.com/webstore/detail/adblock/gighmmpiobklfepjocnamg...
वापरतेय, मेल्स आणि इतर वेबसाईट्स च्या जाहिराती block करायला, पण हे पॉप अप block नाही करत.
मायबोलीवर कधीही पॉपअप यायला
मायबोलीवर कधीही पॉपअप यायला नको. हे धोरण मायबोलीच्या अगदी सुरुवातीपासूनच आहे आणि त्या साठी मायबोली नेहमीच सतर्क असते.
मायबोलीवर कुठल्या जागेत अधिकृत जाहिराती दिसायला हव्यात याचे Screenshot इथे दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/47946?page=2
याव्यतिरिक्त जागेत जर जाहिराती दिसत असतील तर तुमच्या पीसी मधे मालवेअर आले आहे.
काही मालवेअर वाले तर इतके प्रामाणिक असतात की "Ads not by this site" असे सरळसरळ लिहितात. याचा अर्थ त्या मायबोलीच्या सर्वरवरून येत नाहीत. अशा जाहिराती मायबोली.कॉम वर किंवा इतर लोकप्रिय साईटवरच गेल्यावर दिसतील असे या जाहिरातदारांना करता येत पण त्याचा अर्थ त्या मायबोलीवरून येत आहेत असे नाही तर मायबोलीच्या लोकप्रियतेचा त्यांना फायदा घ्यायचा आहे.
मालवेयर साठी मला स्वतःला खालील सॉफ्टवेअर खूप उपयोगी पडले आहे
https://www.malwarebytes.org/
माझ्या लॅपटॉपमधेही किडा
माझ्या लॅपटॉपमधेही किडा किम्वा मालवेअर घुसलंय. मी क्रोम वापरते. अॅडब्लॉकला दाद देत नाहीये. काल अॅडब्लॉक प्लस इन्स्टॉल करायला गेले तर अॅडब्लॉक उडलं. आणी आता काहीच इन्स्टॉल होत नाहीये. नेटवर्क फेल्ड असा मेसेज वारंवार दाखवतं डाउनलोड करायला गेलं तर. आणि रीलोड होत नाही
मोझिला फाफॉ मधे अॅडब्लॉक आहे पण आता तिथून नेट कनेक्ट होत नाहीये. फक्त क्रोममधे नेट चालतंय आणि खूप स्लो झालंय. क्रोमही एकदा काढून टाकून री-इन्स्टॉल केला. सीसीक्लीनर चालवून झाला. पण शून्य उप्योग
अॅन्टिव्हायरस आणि मालवेअर स्कॅनमधे सगळं क्लीन आहे असं दाखवतंय पण प्रचंड पॉपअप्स येताहेत. मजकूरातले शब्द टॅग होताहेत.
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आता वेमांनी दिलेली मालवेअरची लिंक डालो करतेय. पण आणखी काय उपाय?
ती फाईल रन करता येत नाहीये
ती फाईल रन करता येत नाहीये (वेमांनी सुचवलेली)![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मुळात कुठल्याच रेमेडियल लिंक्स इन्स्टॉल होत नाहीयेत
वरदाजी, वर भ्रमर यांनी
वरदाजी, वर भ्रमर यांनी सुचवलेले सॉफ्टवेअर वापरुन पहा. उपयुक्त आहे. सेफ मोड मधुन देखिल चालु शकेल
वेमांनी दिलेली लिंक अखेर
वेमांनी दिलेली लिंक अखेर इन्स्टॉल झाली. काही ट्रोजन्स आणि मालवेअर होते ते उडवले. पण अजूनही अॅडब्लॉक किंवा गूगल क्रोमचं कुठलंही एक्स्टेन्शन इन्स्टॉल होत नव्हतं. मग क्रोम परत री-इन्स्टॉल केला. आता सगळं सुरळीत झालंय. अॅडब्लॉक प्लस इन्स्टॉल झालं.
वेमांनी दिलेली लिंक फारच कामाची आहे. धन्यवाद वेमा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकसत्ता हल्ली वाचता येत
लोकसत्ता हल्ली वाचता येत नाहीये
popup blocker पॉझ करूनही दिसत नाहीये
chrome मध्ये आधी वाचत होते पण दोन दिवस झाले हा problem येऊन
कोणाला उपाय माहीत आहे का?
हल्ली माबो ओपन केल्यावर पण
हल्ली माबो ओपन केल्यावर पण खूप वेळा पॉप अप्स येतात मोस्टली ते विन प्राईज वाले.
काय करायचे त्यासाठी?