एक श्रावण मनात होता.....
चिंब करणार्या सरीमध्ये जेव्हा साथ तुझा होता
प्रित गंधाने ओला एक श्रावण मनात होता
झरणार्या या नभातूनी एक प्रित ओघाळीत होती,
अनोळखिशी धुंद 'त्या' पावसातून होती,
पानापानातुन डोकावणारा ‘तो’ पाऊस वेडा होता,
प्रित गंधाने ओला.....
ओढ होती लागली, अनामिक ती कशाची?
नभातूनी नितळ्त होती बरसात हि प्रेमाची,
तुषार अलगद वेचणारा वारा खट्याळ होता,
प्रित गंधाने ओला.....
दिशातून गुंजत होते सूर ओल्या प्रितीचे,
नयनातूनी बोलत होते भाव अबोल मनीचे,
हरवलो होतो सपशेल चिंब श्वास उरात होता
प्रित गंधाने ओला.....
स्तब्ध होते मन नि भावना बैचेन,
येथे जिंकलो ऐसा, जाता काही हरवून,