घराचा उंबरठा आणि हुरहुर
Submitted by चिमेघ on 5 April, 2014 - 03:51
हल्ली ना मनातील हुरहुर पुन्हा पुन्हा वर उसळी मारायला लागली आहे. जेव्हा घराचा उंबरठा ओलांडला तेव्हापासून ह्या हुरहुरीने अगदी एका मैत्रिणीसारखी सोबत केली, अक्षरशः पिच्छाच सोडला नाही. तसं बघितलं तर अमेरिकेने खूप काही दिलं, जोडीदाराबरोबर एक अनोखा प्रवास सुरु झाला. रक्ताचं काहीही नातं नसताना प्रेमातली नि:स्पृहता अनुभवता आली. एका नव्या जगाचे दरवाजे खुले झाले. नव्या ओळखी झाल्या आणि लोकंही ओळखायला यायला लागली. सुरक्षित छत्रछाया सोडून घरट्याबाहेरचं वास्तव दिसलं, त्याला कसं सामोरं जायचा ह्याचं आपोआपच प्रात्यक्षिक मिळालं, काही काही गोष्टी ना शिकवून येतंच नाहीत त्या अनुभवायला लागतात.
विषय: