RUBAAI

अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई

Submitted by dr.sunil_ahirrao on 14 March, 2014 - 08:34

अजून देहातुनी उसळते अजाण शाई
अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई

अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची
अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई

अधीर गात्रात रात होते पहाटताना ...
अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई

मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो
परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई

हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे
भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई !

अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे
अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई

डॉ.सुनील अहिरराव

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - RUBAAI