पाहिले चालून त्याच्या सोबतीने

पाहिले चालून त्याच्या सोबतीने

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2014 - 03:41

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - पाहिले चालून त्याच्या सोबतीने