कृष्णलीला
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
कृष्णलीला
लेखक: आशिष महाबळ, अदिती जोशी
रेखाटने: सोनाली फडके
मराठी विज्ञान परिषदेच्या २०१३ दिवाळी अंकात प्रकाशीत
"अहो हे पाहिलत का?", किंचित घाबरलेल्या स्वरात सौ. म्हणाल्या.
"काय?", टाईम्सच्या अंकाआडूनच शब्दकोड्यामध्ये व्यत्यय आणला जात आहे हे जाणवेल अशा सूरात श्री उत्तरले.
"अहो, पृथ्वी नष्ट होणार आहे म्हणे".
"आता निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नष्ट होतेच", श्रीं चा अजूनच त्रासिक आवाज.
"तसे नाही हो. आपल्या हयातीतच तो दिवस येणार असे हे म्हणताहेत", अजून घाबरा आवाज.
"म्हणू दे. २०१२ मध्ये झाली का नष्ट पृथ्वी? नाही ना? आताही नाही होणार".
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा