म्हतारी
Submitted by संतोष वाटपाडे on 15 February, 2014 - 00:16
माज्या म्हतारीचं जीणं...व्हतं लई जीवघेणं....
उभ्याउभ्यानं येचलं...पुरं आवीक्षंच तीनं...
म्हातारीचं डोळं भारी...हाक देतं रात सारी...
तीच एकटी उरली...माज्यासाठी रडणारी...
यक लुगड्यात केला...तीनं फ़ाटका संसार...
सोता राहून उपाशी...माज्या घराचा आधार.....
म्हतारीच्या चामडीचं...आता लोंबलं लक्तर....
अडाण्याच्या या लेकीनं...दिलं हातात दप्तर...
काय सांगू इचं गूण...माज्या जल्माचीच खूण...
कसं फ़ेडू सांग देवा...माज्या म्हतारीचं ॠण...
उनामंधी म्हतारीनं...पदराचं झाप केलं...
पाणी पाजाया हातानं...वंजूळीचं माप केलं....
काल दारात सांडलो...पाय गुतून जरासा...
विषय: