खुप काही

हुरहुर..

Submitted by संतोष वाटपाडे on 19 January, 2014 - 11:06

पाहिले चैतन्य सारे पाहिले मी रुप काही,
भेटता बागेत तू डोक्यात आले खूप काही....

बोललो काहीच नाही स्तब्ध होतो तू नि मीही,
वादळे रोखूनही डोळ्यात आले खूप काही...

घ्यायचे हातास हाती द्यायचे होते फ़ुलांना,
चुंबता गालास तू ओठात आले खूप काही....

केस मागे सोडलेले घेतले होते गळ्याशी,
स्पर्शता कंठातले हुंकार आले खूप काही....

ओढणी ओढून सारी देह तू झाकून होती,
धुंद यावे तू मिठीशी वाटले अन खूप काही...

श्वास श्वासातून वाहू लागला हलकेच जेव्हा,
तापल्या देहात या होऊन गेले खूप काही....

मोगरा माळून आली अत्तरे लावून गेली,
गंध बागेतील तेव्हा बोलला मज खूप काही....

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - खुप काही