अन्या - ७
Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2013 - 05:47
पतंग उडेपर्यंतच प्रश्न असतो. एकदा तो वार्यावर उडाला की आणखी वर जाणे हे त्या उंचीनेच शक्य होते.
सफाई अभियानामुळे लाभलेल्या उंचीचा फायदा असा झाला की पुढील भरारी सुलभ झाली. अन्याला पाटलांच्या घरी पूजेसाठी जावे तर लागले नाहीच, उलट पाटील आपल्या कुटुंबियांसकट अवलिया बाबांच्या झोपडीसमोर हजर झाले आणि भक्तीभावाने त्यांना अभिषेक घालून गेले.
विषय:
शब्दखुणा: