दी वॉर - भैया, ये दीवार टूटती क्यूं नही है ?
Submitted by उद्दाम हसेन on 31 July, 2013 - 16:00
( दीवार या सलीम जावेद लिखित अप्रतिम चित्रकृतीशी संबंधित सर्वांचीच माफी मागून )
विष्णूच्या शापाने कायम अवतार घ्याव्या लागणा-या दोन द्वारपालांनी भूतलावर काहीच काम न उरल्याने आणि स्पष्ट आदेश नसल्याने पक्षांतर करून अवतार घेतला आणि या अवतारात ते लेखक झाले. आपल्या उचापतींनी ते बॉलीवूड क्षेत्री आपला जम बसवून सलीम जावेद नावाने प्रसिद्ध झाले. कलियुग नुकतेच येत असल्याने त्यांच्या लिखाणाला प्रचंड मागणी आली आणि देवतास्वरूप राजेंद्रकुमार, राजेश खन्ना यांचं प्रेमळ युग संपून रागीट तरुणांचं युग सुरू झालं.
विषय:
शब्दखुणा: