"रामलाल" डि. वाय. पाटील स्टेडीयम, नेरुळ आयपीएल २००८
Submitted by विजय वसवे on 1 May, 2013 - 11:31
IPL चं पहीलं वर्ष २००८. पुण्यामधे मॅच बघायची सोय नव्हती. म्हणुन काय गप्प बसतोय होय आम्ही?. मुंबईच्या मॅचेस बघायचा जुनुन सवार असायचा आमच्यावर. त्यातल्या त्यात नेरुळला आमची पसंती असायची. एक्सप्रेस हायवेने गेले की अगदी जवळ पडायचे नेरुळ. मॅच पहायची तर हौस पण तिकीटे कशी काढायची?? मोठा गहन प्रश्न असायचा. सगळी चक्रे फ़िरवल्यानंतर एक धागा जोडलाच आम्ही. नेरळचे स्टेडीयम DY Patil कॉलेजचे, पिंपरीत पण DY Patil कॉलेज आहे. भुमितीतले समीकरण वापरले. DY Patil कॉलेज= IPL मॅच. म्हणजे पिंपरीतील कॉलेजचा काहीतरी संबंध असणारच याच्याशी. संदीप आहेर कडुन अभय कोटकरांचा नंबर घेतला.
विषय:
शब्दखुणा: