चैत्रेय
Submitted by pareshkale on 1 May, 2013 - 08:30
चैत्रेय,
चैत्रात जन्मलेला.
तुला आठवतं ?
आपली मैत्रीही चैत्रातील
नवीन धुमाऱ्या सारखी,
पान पल्लवीसारखी
सळसळणारी !
कळालही नाही
कधी गुरफटत गेलो !
मैत्रीच्या दवात
सहज भिजून गेलो.
नंतरच्या वसंता प्रमाणेच
फक्त बहरत होतो
आपण दोघं
आणि आपली मैत्री !!
या मैत्रीत मात्र
एक गमंत होती
तुला न मला
या मैत्रीला बनवायचं होतं
एक रेशीम गाठ !
कधीही न तुटणारी,
एक पालवी
दर वसंतास
जोमाने फुलणारी.
विषय: