फ्री वर्स

.....चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

Submitted by बागेश्री on 1 March, 2013 - 23:29

अनेक उभ्या- आडव्या
रेखा जोडत,
पूर्णत्वाचा आकार
साकारला गेलाच होता,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

घोंघावणारा वारा होता,
शमलेली धूळ होती,
पावसाचा भास होता,
सुख- दु:खाची सरमिसळ होती....

आता हवी फक्त 'एक रेषा'
तुझ्या ओठांच्या दोन टोकांना जोडणारी
निर्जीव ह्या चित्रात,
स्मितहास्य भरणारी..

रंगाशिवायही जुळून आलेलं
ते एक रेखाचित्र होतं,
शेवटच्या ह्या रेषेनंतर
आजन्म जपावं असं गुपित होतं,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - फ्री वर्स