बाऊ
Submitted by सुसुकु on 12 February, 2013 - 12:57
एक होती माऊ एकदा झाला तीला बाऊ
बाऊ झाला छोटा पण आवाज आला मोठा
एक होता ससा म्हणें झाला बाऊ कसा
माऊ म्हणे भांडले पाय घसरून पडले
एक होता पांडा तो म्हणे कशास भांडा
मी नाही भांडले तिनेच भांडण काढले
एक होते भूभू म्हणें जरा बाऊ बघू
माऊ म्हणे छट नाही दाखवणार हट
एक होता बोका तो म्हणे हळद टाका
माऊ म्हणे हट तूझी माझी गट्टी कट
एक होता काऊ तो म्हणे औषध लाऊ
माऊ म्हणे नको बाऊ चालेल औषध नको
एक होते माकड ते म्हणे रडू सोड
माझ्यासारखे नाच पोट धरून हस
माऊ लागली हसू केली हळूच खुसुखुसू
म्हणाली काही नाही झाले जास्त नाही लागले
भांडले तर भांडले पडले तर पडले
विषय: