तस्वीर तरही : एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा
Submitted by मकरंद.११७७ on 12 February, 2013 - 10:48
एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा
मीहि तैसा एकला अन तूहि तैसा सागरा
सागराच्या गौरवाचे का हवे रे गोडवे
माझिया तृष्णेस पुरतो आड घट अन कासरा
तू कुठे अन मी कुठे हे हा न रस्ता सांगतो
हरवला कोठे न कळले मोर अल्लड नाचरा
बाळ स्वप्ने बाळ डोळे बाळ शाळा आपली
कामधेनू शिक्षणाची दूध पाजे वासरा
कालगंगा फूल अन 'मकरंद' होती तारका
काळ व्यापे चंद्र तारे शून्य करतो अंतरा
विषय: