मॉलिश

शरिरासाठी आयुर्वेदिक तेल

Submitted by हर्ट on 12 November, 2009 - 23:03

दिवसभर वातानूकुलित ऑफीसात बसल्यामुळे शरिराची हाडे अगदी गारठून जातात. घरी जाउन मी किंचित गरम पाण्यानी स्नान करतो मग जरा सैल वाटायला लागतं. त्यानंतर मी योगाही करतो मग तर अजूनच छान वाटतं. मी असे ऐकले आहे की तेल जर शरिराला चोळले तर म्हातारपणातली अंगदुखी टाळता येते. मी माझ्या म्हातारपणाचा विचार नक्कीच करतो. कधीतरी ते येईलच. म्हणून अशी काही तेलं सुचवा जी शरिराची दुखणी जशी की सांधेदुखी, पायाच्या पोटर्‍या, गुडघा, कंबरदुखी टाळू शकतात. माझा विश्वास आहे आयुर्वेदावर. नारायण तेल खरचं शरिराला उत्तम का? की फक्त पायांसाठी हे तेल उत्तम? मला माझ्या आईकरिता पण हे तेल एकदा तिच्यावर प्रयोग करुन पहायचे आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मॉलिश