शरिरासाठी आयुर्वेदिक तेल

Submitted by हर्ट on 12 November, 2009 - 23:03

दिवसभर वातानूकुलित ऑफीसात बसल्यामुळे शरिराची हाडे अगदी गारठून जातात. घरी जाउन मी किंचित गरम पाण्यानी स्नान करतो मग जरा सैल वाटायला लागतं. त्यानंतर मी योगाही करतो मग तर अजूनच छान वाटतं. मी असे ऐकले आहे की तेल जर शरिराला चोळले तर म्हातारपणातली अंगदुखी टाळता येते. मी माझ्या म्हातारपणाचा विचार नक्कीच करतो. कधीतरी ते येईलच. म्हणून अशी काही तेलं सुचवा जी शरिराची दुखणी जशी की सांधेदुखी, पायाच्या पोटर्‍या, गुडघा, कंबरदुखी टाळू शकतात. माझा विश्वास आहे आयुर्वेदावर. नारायण तेल खरचं शरिराला उत्तम का? की फक्त पायांसाठी हे तेल उत्तम? मला माझ्या आईकरिता पण हे तेल एकदा तिच्यावर प्रयोग करुन पहायचे आहे.

कृपया अनुभवी आणि ज्ञानी जणांनी इथे लिहावे. मी आभारी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो चंदनबलालाक्षादी मसल्ससाठी उत्तम आहे म्हणतात आणि कुठल्याही तेलाचे मर्दन हे वातविकार कमी/ नाहीसे होण्यासाठी गरजेचे असते.

नीरजा आणि दिपु, धन्यवाद. मला चंदनबलालाक्षादी हे तेल माहिती नव्हते. कुठल्याही आयुर्वेदीक दुकानात मिळेल का? जसे की बैधनाथांच्या दुकानात वगैरे?

अजून काही माहिती विचारायची होती. तेल लावायची खरी पद्धत कशी आहे? कुठला प्रहर योग्य? किती प्रमाणात तेल लावायचे? रोज की अधूनमधून? वातावरणाचा काही परिणाम होतो का? जसे की तिळाचे आणि बदामाचे तेल माझ्यामते हिवाळ्या खेरीज इतर ऋतुंमधे शरिराला उष्ण होईल तर चंदनाचे तेल हिवाळ्यात शरिराला थंड होईल. तेल कसे निवडावे ऋतुनुसार? तेल लावल्यानंतर किती तास ते ठेवावे? रात्री तेल लावून सकाळी ते धुतले तर चालते का?

माहितीबद्दल धन्यवाद.

चन्दनबलालाक्षादि विशेषतः लहान बाळान्ना लावण्यासाठी वापरावे. त्यातील लाक्षा म्हणजे लाखेचे गुणधर्म बाळाच्या हाडान्च्या योग्य वाढीसाठी उपयोगी पडतात.
बी, तुला लावायला नारायण तेल चालेल. नाजुक, पित्तप्रक्रृती असेल तर क्षीरबला चान्गले.
आधीच दुखत असेल काही आणि थण्ड वातावरणात असशील तर बला-अश्वगन्धादि तेल वापर.

तेल साधारण पणे शक्य असेल तर अन्घोळीपुर्वी लावावे, १५-२० मिनिटे थाम्बुन गरम पाण्याने अन्घोळ करावी.
किन्वा रात्री लावुन झोपावे.

आणखी लिहिते जरा वेळाने.

न्यति ने बरच सन्गितलय.
आयुर्वेदात दिनचर्येत अभ्यन्गाचे महत्वाचे स्थान आहे.अगदी नवजात बाळा पासून सग्ळयान्नाच अभन्ग हीतकारक आहे.
आयुर्वेदानुसार प्रत्येकाची प्रक्रुती ही वेगवेगळी असते,आणि प्रक्रुती नुसार त्यात काहीत विशेष तेलान्चा वापर अभ्यन्गा करिता करावा असा उल्लेख आहे.
मुख्यत्वेकरून तीळ तेलाचा माध्यम म्हणून वापर करून त्यात औशधी वनस्पतीन्चा काढा घलून तेल सिध्ध करतात्.यामुळे ते औषधी गुण्धर्म तेलात उतरतात.
तेल हे स्वभावतह स्निग्ध गुणाचे असते.त्यामुळे वाताच्या रुक्ष गुणास कमी करणारे असते.
त्यामुळे वात जन्य व्याधीत तसेच म्हातारपणात निसर्गतह वाढलेल्या वात गुणात अभ्यन्गाचा निश्चितच उपयोग होइल.
प्रमुख्याने प्रक्रुती नुसार खालिल तेलान्चा उपयोग होइल्,मात्र व्याधी आणि अवस्थेनुसार एखादे विशेश उपयोगी होउ शकते.यासठी निशितच तज्ञ वैद्यान्चे मर्ग्दर्शन घ्यावे.
अभ्यन्ग म्हणजे केवळन्गला तेल चोपडणे नव्हे तर अभ्यन्गाच्या विशिष्ट पद्धती आहेत.
वात प्रक्रुती च्या लोकान्ना स्र्वसाधारणपणे-नारायण तेल्/महानारायण तेल/धान्वन्तर तेल
पित्त प्रक्रुती-क्षीरबला तेल, चन्दन बला लक्षादि तेल
कफ प्रक्रुती साठी -सहचरादि तेल्,त्रिफलादि तेल इत्यादि.

मला वात, कफ, पित्त या पैकी काहीच नाहीये. मला निरामय निरोगी जगायचे आहे म्हणून जे जे चांगले फायदेशीर आहे ते ते मी आचरण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही करा.

माहितीबद्दल धन्यवाद!

किती प्रमाणात तेल लावायचे?>>>
सुरुवातीला जास्त लागते (शरीराच्या गरजेनुसार रुक्षपणा जास्त असेल तर), जितके मुरेल तेवढे लावावे. नियमित लावल्यावर शरीराची स्नेहाची गरज आपोआप कमी होते मग सुरुवातीपेक्षा कमी लावावे लागते.

सम्पुर्ण अन्गाला नाही जमले तरी किमान डोके, पाय आणि कानात जरुन तेल टाकावे.
कानात टाकताना तेल कोमट करुन घ्यावे, थन्ड टाकु नये.
इतरही वेळी कोमट करुनच वापरावे.

वातावरणाचा काही परिणाम होतो का>> उष्ण हवामान असेल तर खुप उष्ण द्रव्यान्नी सिद्ध केलेली तेले सोसणार नाहीत. अशा वेळी खोबरेल तेलाचा बेस असलेली किन्वा तिळतेलाचा बेस असलेली पण सौम्य तेले (जसे क्षीरबला) वापरावीत.

मला वात, कफ, पित्त या पैकी काहीच नाहीये.<<
प्रत्येक माणसाची यापैकी एक प्रकृती असते. काहीच नाहीये असं नसतं. काहीच नाहीये म्हणजे कुठलाही दोष बिघडलेला नाहीये. प्रकृती त्रिदोषात्मक असतेच.

नीधप, टिळकला होते मी.
तुझ्या ओळखीतले आहे का अजुन कोणी?

कुठला प्रहर योग्य>>>
खरेतर सकाळी अन्घोळीपुर्वी किन्वा रात्री झोपताना लावावे. दिवसाच्या वेळेपेक्षाही महत्वाचे म्हणजे खुप भुकेल्यापोटी, किन्वा जेवणानन्तर लगेच तेल लावु नये. तसेच तेल लावल्यावर लगेच थन्ड पाण्याने अन्घोळ करु नये, गार वार्‍यात जाउ नये, एसी/फॅन समोर बसु नये.

न्याती, कसं कळायचं की आपला दोष कुठला आहे? कफ की वात की पित्त?>>> याबद्दल लिहिते एकदा सविस्तर.

हो

Maze hath v kumber khup dukhtat mahanarayan tel vaparale tar chalel ka v kuthlya company ch vaprayach he pls sanga.

Kalpana.................