हवाई बेटांविषयी माहिती हवी आहे
Submitted by सानिका on 10 January, 2013 - 17:07
फेब्रुवारीमध्ये हवाईला जायचा बेत आहे. १ आठवडा तिथे राहणार आहोत. Oahu, Kaui, Maui, Big Island ह्यापैकी नक्की कुठे कुठे जावं ते ठरविण्यासाठी माहिती हवी आहे. मायबोलीकरांपैकी कोणाला अनुभव असल्यास इथे शेअर कराल का? ईतर ब्लॉग वर काही अनुभव असल्यास प्लीज शेअर करा ना.
(१) होस्टेल (हॉटेल नाही ) मध्ये राहायचा विचार करतोय. कारण तिथे सुसज्ज किचन असतं. बाहेरचं सलग ८ दिवस नाही जेवू शकणार. तसंच हॉटेल आणि जेवण-खाणं महाग आहे. त्यावर जास्त पैसे खर्च करायची इच्छा नाही. या आधी होस्टेल मध्ये राहिलो आहोत. खूप चांगला अनुभव होता. कोणाला हवाईच्या होस्टेलचा अनुभव असल्यास प्लीज सांगा.
विषय:
शब्दखुणा: