शांती -नवं वर्षातली
Submitted by अत्रुप्त आत्मा on 3 January, 2013 - 06:12
नावातकायआहे...(असं आय.डी.नेम धारण करणार्या) आमच्या एका मित्राच्यामुळे आज आमच्या मनातुन ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...
नावातकायआहे,म्हणती मला इथेही
लागणार करावी शांती ,या नवं वर्षी ही...
आंम्हासी आहे येथे, रोजचाची मुहुर्त,
लाकडे पेटवा फक्त, आग लाऊनी...
होम हवन शांती,करायची कोणी?
पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा...
नसे कोणी येथे,भला वीर ऐसा
जो आत्मबळे सार्यांना,देऊ शके शांती...
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती
संसारास निगुती,ऐसी मानवे ना...
खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म
प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात...
विषय:
शब्दखुणा: