आहेर

आहेर भैरव

Submitted by मुंगेरीलाल on 25 December, 2012 - 07:44

आजकाल लग्न समारंभ मी चुकवीत नाही. कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भेटीगाठींपेक्षाही जरा निराळ्या चवीचं सुग्रास जेवण यथेच्छ झोडणे हा माझा अंतस्थ हेतू असतो. शिवाय बहुतेक ठिकाणी आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नये असे पत्रिकेत लिहिलेलंच असतं त्यामुळे या गोष्टी आवर्जून वेळ काढून विकत आणण्याचे कष्टही जवळपास इतिहासजमा झालेले आहेत. जरा बऱ्यापैकी कपडे घातले की काम झालं. पूर्वी असं नव्हतं. अगदी सुरवातीला अशी सूचना छापून यायची तेंव्हाही ते खरोखरच प्रमाण मानायचं की तरीही काहीतरी न्यायचंच या संभ्रमात पडायला व्हायचं. बायको म्हणायची ‘अहो ते लिहायची पद्धत आहे, पण आपण जवळचे पडलो, बरं दिसत नाही’.

विषय: 
Subscribe to RSS - आहेर